मुंबई/प्रतिनिधी
आंध्रप्रदेश सरकारने नवीन 13 जिल्हे बनवत असल्याचा प्रस्ताव मांडला. आणि त्याची बजावणी 13 एप्रिल रोजी झाली. त्यामुळे आंध्रा मध्ये नवीन 13 जिल्हे उदयास आले.
तर 18 मे ला कोनासीमा जिल्ह्याचं नाव बदलून डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असं नाव करण्यात येणार असल्याचं सरकारनं notification काढलं. परंतु मनुवादी विचारसरणीच्या लोकांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर नाव खटकलं. रस्त्यावर येऊन त्यांनी हाहाकार माजविला, मंत्र्यांचं घर जाळलं गेलं.
सरकारने कोनसीमाचे नाव बदलून डॉ भीमराव रामजी आंबेडकर कोनासीमा जिल्ह्याचे अमलापुरम हे मुख्यालय करण्याचा निर्णय घेतला होता.नव्याने स्थापन झालेल्या काही जिल्ह्यांना NTR, अल्लुटी सीताराम राजू आणि अन्नमय्या यांसारख्या प्रमुख व्यक्तींची नावे दिली आहेत मग डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाला विरोध का ?
नव्याने निर्माण होत असलेल्या डॉ. भीमराव रामजी आंबेडकर जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या ही अनुसुचित जातींच्या लोकांची आहे. तरीही काही स्थानिक लोकांनी जिल्ह्याच्या नामांतराला विरोध केला आहे.