महाराष्ट्रात आणखीन एका बंडाची चाहूल, पुन्हा एकदा राजकीय भूकंप

मुंबई/प्रतिनिधी

शिवसेनेत बंड झालं आणि राज्यातच नाही तर देशाच्या राजकारणात पण खळबळ उडाली. बंड झालं सत्तांतर झालं, राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपच सरकार आलं. मात्र सरकार सत्तेत येऊन अवघे काही महिने उलटले असताना आता महाराष्ट्रात आणखीन एका नव्या बंडाची चाहूल लागली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीची चर्चा अजून पण राजकीय वर्तुळात रंगत आहे.

शिवसेनेचे आमदार फुटले पण त्यानंतर आता राष्ट्रवादी पण फुटणार असल्याचा दावा भाजपा आणि शिंदे गटाकडून केला जातोय. राष्ट्रवादीतील फुटेच्या चर्चा रंगत असताना आता फक्त राष्ट्रवादीच नाही तर काँग्रेसमध्ये पण बंड होणार असल्याचे संकेत भाजप नेत्यांनी दिलेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येतोय. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी हा मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केलाय. दानवेंच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचे राजकारणात खरंच पुन्हा एकदा मोठी मुलतापालत होणार की काय? असा प्रश्न आता सर्वांनाच पडतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचे वक्तव्य केल्यानंतर दानवेंनी शिंदे गटातील फुटीवर पण भाष्य केलेय. शिंदे गट फुटण्याआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येच आमदार पळतील असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे. 

इतकंच नाही तर शिंदे गटातील काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या चर्चांवरही मौन सोडलेय. शिंदे आणि भाजपचा नेतृत्वात सरकार स्थापन झालं हे सरकार आम्हाला टिकवायचे म्हणून आम्ही शिंदे गटातला एकही आमदार भाजपमध्ये घेणार नसल्याचा दानवेंनी स्पष्ट केले. तर आम्ही कोणताही राजकीय पक्ष सोडणार नाही असे आम्ही म्हणत आलो मात्र अंतर्गत लाथाळी मुळे सरकार पडले. असा टोला ही दानवेंनी लगावला. एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस फुटणार असल्याचा दावा भाजप नेते वारंवार करतात तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेतेही शिंदे सरकार पडणार असल्याचे ठामपणे सांगतात सत्ताधारी आणि विरोधकांकडून होत असलेल्या आरोप प्रत्यारोप आणि दुसरीकडे मात्र शिंदे गटात अंतर्गत कलह वाढताना दिसत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published.