मुंबई/प्रतिनिधी
मुंबई मनपाच्या माहितीमुसार गेल्या दोन आठवड्यांत डोळ्यांची साथ (eye conjunctivitis) तिपटीने वाढली आहे. डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून घाण येणे, डोळ्यांना खाज येणे, डोळा दुखने ही या आजाराची काही प्रमुख लक्षणे आहेत. हा आजार पाच ते सहा दिवसांत बरा होतो. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी घरगुती उपाय न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.
कसा होतो संसर्ग?
डोळे येण्याचा संसर्ग सर्वात आधी एकाच डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही त्याचा संसर्ग होतोच.
सर्व प्रथम एक डोळा दुखण्यास सुरुवात होते.
नंतर डोळ्यतून पाणी येते.
हळू-हळू डोळ्यातून घाण येण्यास सुरुवात होते.
काही वेळानंतर डोळ्याला सुज येते.
शेवटी डोळा लाल होण्यास सुरुवात होते.
संसर्ग कसा ओळखायचा?
डोळ्यात काहीतरी गेल्यासारखं वाटतं
डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून घाण येणे, डोळ्यांना खाज येणे, डोळा दुखने ही या आजाराची काही प्रमुख लक्षणे आहेत.
डोळ्याच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येऊन लाल दिसतात.
डोळे येण्यासोबतच संसर्गामुळे ताप, सर्दी, खोकला या समस्याही जाणवतात.
डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?
डोळ्यांना स्पर्श करणे टाळा
हात लावल्यास ते स्वच्छ धुवा
डोळे पुसण्यासाठी एक वेगळा रुमाल सोबत ठेवा.
घरगुती उपाय करु नका.
प्रवास टाळा
संसर्गाच्या काळात इतरांपासून दूर राहा.
डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.