मोठी बातमी: वंचित बहुजन आघाडी शिवसेनेत जाणार ? शिवसेना खासदार राऊतांच मोठं विधान 

सोलापूर/प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या प्रा.सुषमा अंधारे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील संपूर्ण वंचित बहुजन आघाडी पक्ष शिवसेनेत येण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, असं मोठं विधान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधताना केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पहिल्यांदाच जाहीर सभा घेणार आहे, त्यानिमित्ताने खासदार राऊत हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समर्थन दर्शवलं आहे.त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी देखील शिवसेनेत येण्याच्या मानसिकतेत आहे.

दरम्यान,खासदार विनायक राऊत हे आज शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात जाहीर सभा देखील घेणार आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published.