मुंबई/प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद सुरू असल्याचा बातम्या काही दिवसांपूर्वी येत होत्या. या चर्चा मागे पडतातनी पडतात तोपर्यंत शिंदे सरकारमधील आणखी काही बड्या नेत्यात वादाची ठिणगी पडली. आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला गेलेला असताना आता शिंदे गटातील आणखी दोन आमदारांचा वाद चव्हाट्यावर आलाय, त्यामुळे आता शिवसेना फोडून वेगळा झालेला शिंदे गट पण आता फुटणार की काय असा प्रश्न उपस्थित झालाय.
बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच पेटलाय शिंदे गटातील आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप रवी राणांनी केला आणि नवा वाद सुरू झाला. राणा यांनी केलेल्या आरोपानंतर रवी राणांनी पुरावे द्यावेत अन्यथा एक तारखेला 7 ते 8 आमदार घेऊन वेगळा निर्णय घेऊ असा थेट इशारा बच्चू कडू यांनी शिंदे सरकारला दिला.
या वादामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच,आता शिंदे गटातील आणखीन दोन बड्या आमदारांमध्ये वादाची ठिणगी पडली. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदारच चिमणराव पाटील यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आलाय. इतकच नाहीतर गुलाबराव पाटील यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली आहे. हे सरकार अल्पकालीन असल्याच विरोधकांकडून टीका होते. त्यातच आमदारांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे शिंदे गटाच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
प्रकरण नेमकं काय?
शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्याला माझ्या विरोधात निधी दिला जातोय अशी तक्रार करत चिमणराव पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती. त्यानंतर आता गुलाबराव पाटलांनी पण एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली. एकीकडे चिमणराव पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यात नववा सुरू झालाय तो दुसरीकडे बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद ही आता विकोपाला गेलाय रवी राणांच्या खोके घेतल्याचा आरोपावर बोलताना मी एकटाच गुहाटी ला गेलो नव्हतो, माझ्यासोबत आणखी 50 आमदार होते. राणांच्या आरोपामुळे त्या 50 आमदारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 50 आमदारच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतय असं बच्चू कडू म्हणाले. या वादावरून राजकारण चांगलंच तापलंय आणि यात विरोधकांनी उडी घेतली.
आज बच्चू कडू आणि रवी राणा भांडतायत, उद्या भाजप आणि शिंदे गट एकमेकांच्या उरावर बसतील. शिंदे गटात सगळे स्वार्थासाठी गेले आहेत. पण आता त्यांचा तिथे अपेक्षाभंग झाला अशी खोचक टीका विनायकराव राउत केली आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांचा वाद. आणि त्यात आता आणखी दोन आमदारांमध्ये वादाची ठिणगी पडल्यामुळे कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.