एकनाथ खडसेंची दिवाळी तिखट, ‘या’ कारणामुळे खडसे पुन्हा अडचणीत

Eknath Khadse

मुंबई/प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी महसूल मंत्री असताना पुण्यातील भोसरी येथे 3 एकर जमीन, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावावर खरेदी केली होती. ही जमीन खरेदी करताना त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली होती. तसेच त्यांना पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. परंतु नंतर खडसेंनी त्यांना क्लिन चीट मिळाल्याचं वारंवार सांगितलं आहे.

परंतु हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आल्यानं खडसेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुन्हा एकदा या जमीन प्रकरणाचा सविस्तर तपास केला जावा, असा आदेश कोर्टानं दिला आहे. त्यामुळं आता एसीबी मार्फत त्यांची पुन्हा चौकशी होणार आहे.

दरम्यान, खडसे यांची या प्रकरणी पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती. अखेर शुक्रवारी या तपासासाठी न्यायालयाने परवानगी दिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published.