फडणवीस यांचा पलटवार, जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा !

मुंबई/प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बीकेसीतील सभेनंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत जोरदार पलटवार केला आहे. अरे छट हा तर निघाला…आणखी एक ‘टोमणे बॉम्ब’… जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, असे म्हणत ट्विट केले आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते काय बोलणार याची उत्सुकता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल मुंबईतील बीकेसीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप, हिंदुत्व अशा अनेक मुद्द्यांवर परखड टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या टीकेचा देखील उद्धव ठाकरे यांनी समाचार घेत प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर सभा झाल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक ट्वीट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघ आणि भाजपवर जोरदार टीका केली. ही टीका भाजप आणि संघाच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे जोरदार प्रत्युत्तर येणार असे संकेत मिळत होते. आता फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम…अरे छट हा तर निघाला…आणखी एक ‘टोमणे बॉम्ब’… जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा !!! असे म्हणत भाजप जोरदार प्रत्युत्तर देणार याचे संकेत दिले आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published.