“प्रकाश आंबेडकरांनी मला ओळखावं यासाठी मी काही आरएसएस…” सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

मुंबई/प्रतिनिधी

गेल्या काही दिवसात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी सुषमा अंधारे यांच्या बद्दल विचारले असता, त्यांनी कोण सुषमा अंधारे मी त्यांना ओळखत नाही असं विधान केलं होतं. 

त्याच वक्तव्यावर शिवसेनेच्या उपनेते असलेल्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हटले त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये,

एड.प्रकाश आंबेडकर मला ओळखत नाही असं विधान केल्याने काही भावंडांना थोडसं वाईट वाटलं आणि ते चिडून काही बाही लिहीत आहे पण मला वाटतं आपण चिडू नये. कदाचित नसतील ते ओळखत काय हरकत आहे ?

ला त्यांनी ओळखावं यासाठी मी काही देवेंद्र फडणवीस नाही किंवा आरएसएसचा फार मोठा पदाधिकारी नाही, किंवा कुणी मुख्यमंत्री अथवा या देशाचा पंतप्रधान नाही किंवा मी फार कुणी मोठा अब्जोपती करोडपती असाही नाही किंवा मला फार मोठा भव्य दिव्य काही राजकीय वारसाही नाही. 

“मी दुर्गम पहाडी भागातील “वंचित” घटकातील आहे तेंव्हा माझ्यासारख्या वंचितांची ओळख त्यांना असावी हे अपेक्षितही नाही.”

पण मी त्यांना ओळखते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या नावातील आंबेडकर नाव हे त्यांच्या नावाशी जोडलेले आहे त्यामुळे मी त्यांना निश्चितच ओळखते. 

आणि त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याची कामना जशी प्रत्येक वाढदिवसाला करते तशीच आजही करते.

आपली बहीण – सुषमा अंधारे

Share

Leave a Reply

Your email address will not be published.