मुंबई/प्रतिनिधी
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बीडमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि कापूस पिकाच नुकसान झालेलं आहे. यावेळी संभाजीराजेंनी मंत्र्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारमधील मंत्र्यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी यावं की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. मी मात्र राजवाडा सोडून शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बांधावर आलोय अशा भावना यावेळी संभाजी राजेंनी व्यक्त केली.
मागील चार दिवसांपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला आहे. अजूनही कोणीही मंत्री या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तिथे पोहोचलेले नाही. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे देखील बीडमध्ये गेले नाही. संभाजी राजे छत्रपती यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
एनडीआरएफ आणि एसआरएफ च्या विशेष बाबी मधून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करा अशी यावेळी सरकारकडे त्यांनी मागणी केली. सरकारने शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घ्यावे अशीही मागणी संभाजीराजेंनी केली आहे.