एकदा नाही लाख वेळा गद्दार म्हणेन, हिम्मत असेल तर…

मुंबई/प्रतिनिधी

शिवसैनिक तोच आहे जो ठाकरे आणि मातोश्रीसोबत आहे. ज्या ज्या लोकांनी मातोश्रीला धोका दिला ते माझ्यासाठी गद्दारच आहे. त्यामुळे मी एकदा नाही तर लाख वेळा गद्दार म्हणणार. संतोष बांगर यांच्यात हिम्मत असेल तर माझ्या कानाखाली त्यांनी मारावी. त्यांच्या समर्थकांना मला फोन करायला सांगण्यापेक्षा, मला फोन करुन त्यांनी धमकी द्यावी, असं प्रतिआव्हान शिवसेनेची रणरागिणी अयोध्या पौळ यांनी शिवसेना आमदार संतोष बांगर यांना दिलं आहे.

ठाकरेंसाठी अश्रू ढाळणारे आणि शिंदे गटात जाण्यासाठी २४ तासांत पलटी मारलेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी काल कार्यकर्त्यांना चिथावणी देताना हिंसेची भाषा बोलली.जो आपल्याला गद्दार म्हणेल त्याच्या कानाखाली आवाज काढा, अशी चिथावणी त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. आपण मरेपर्यंत शिवसैनिक राहणार आहोत. पण आपल्याला का रे करत असेल तर त्यांच्या कानाखाली जाळ काढा, असं संतोष बांगर संतापून म्हणाले. त्यांच्या याच आव्हानाला सेनेच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांना प्रतिआव्हान दिलंय.

“जे उद्धव ठाकरेंना सोडून गेलेत ते गद्दारच आहेत. मी त्यांना गद्दारच म्हणते. एकदा नाही लाख वेळा मी त्यांना गद्दार म्हणते. शिवसैनिक तोच आहे जो ठाकरे आणि ‘मातोश्री’सोबत आहे. ज्या ज्या लोकांनी ‘मातोश्री’ला धोका दिला ते माझ्यासाठी गद्दारच आहे. संतोष बांगर यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मला मारावं. त्यांच्या बगलबच्च्यांना मला फोन करुन धमकी द्यायला लावू नये. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी स्वत: मला फोन करावा”, अशा शब्दात अयोध्या पौळ यांनी ठणकावलं आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published.