मुंबई/प्रतिनिधी
2021 पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत आज मुंबईचे पोलीस महासंचालक यांनी एक परिपत्रक जाहिर केलं आहे. यामध्ये जाहिरातीचा विहित नमुनाही देण्यात आला आहे.
या विहित नुमण्यामध्ये 14 हजार 956 पोलीस शिपाई संवर्गात रिक्त जागांचा पदांचा सामाजिक आरक्षण निहाय डेटा देण्यात आलेला आहे.
या परिपत्रकात सन 2021 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदांची माहिती कार्यालयास सादर करण्यात आलेली आहे असं सांगण्यात आले आहे, त्यानुसार घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक 1.1.2022 या दिवशी वर्तमानपत्रात देण्यात यावी असेही कळविण्यात आले आहे.