मुंबई प्रतिनिधी
राजकीय वर्तुळात शिंदे-ठाकरे गटाच्या वादाची ठिणगी पडण्यापूर्वीच, आणखी एक वाद सातत्याने चव्हाट्यावर येत होता. गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे आणि राणे कुटुंबीयांचा वाद सुरू आहे. पण आता ठाकरे गटातील एका आमदाराने राणे कटुंबाबाबत एक सूचक वक्तव्य केल्यानं, राणे कुटुंब खरच ठाकरेंसोबत आहेत का ? अशी खळबळ महाराष्ट्राच्या राजकारणात उडाली आहे.
गेल्या दोन दिवसात नितेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगलेला दिसतोय. दोन्ही बाजूने एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. कुडाळ मधील एका कार्यक्रमात भास्कर जाधव घराबाहेर पडू शकणार नाहीत असं वक्तव्य नितेश राणे यांनी केल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला होता. आणि त्याच रात्री भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरा सभोवताली दगड व काचेच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच भास्कर जाधव यांनी राण्यांना बेडूक कोंबडी चोर असं बोलून त्यांची नक्कल सुद्धा केली होती. त्यामुळे राणे आणि ठाकरे गटातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
पण आता ठाकरे गटातील एका आमदाराने राणे कटुंबाबाबत एक सूचक वक्तव्य केल्यानं, राणे कुटुंब खरच ठाकरेंसोबत आहेत का ? अशी खळबळ महाराष्ट्राच्या राजकारणात उडाली आहे.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी नारायण राणे ठाकरेंसोबत असल्याचा खळबळजनक वक्तव्य केल आहे. नुकतेच राजन साळवी म्हणाले आहेत की, नितेश राणे आमचे विरोधक आहेत. राणे कुटुंबीयांना समजायला हवं की आज नितेश राणे निलेश राणे यांना बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद लाभला.
हे सांगताना त्यांनी अजून एक अंदर की बात सांगितली आहे. ते म्हणाले “ये अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है” असा दावा साळवींनी केलाय आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ठाकरेंना धारेवर धरणारे राणे कुटुंबीय खरंच ठाकरेंसोबत आहेत का अशी चर्चा रंगली आहे.