मुंबई/प्रतिनिधी
“काही राजकीय पक्ष, त्यांची इको सिस्टीम आणि दुर्दैवानं बोटावर मोजण्याइतके चार-पाच एचएमव्ही पत्रकार हे महाराष्ट्रातून उद्योग चालल्याचं फेक नरेटिव्ह तयार करत आहेत”, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्यांच्या या विधानावर आदित्य ठाकरेंनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार भूमिका मांडलीये. फडणवीसांना उत्तर देतानाच रोहित पवारांनी जनतेलाही आवाहन केलंय.


देवेंद्र फडणवीसांच्या एचएमव्ही पत्रकार विधानावर बोट ठेवत रोहित पवारांनी एक ट्विट केलंय. ते म्हणतात, “महाराष्ट्राची बाजू मांडणारा मग तो पत्रकार असो… युवा असो… किंवा सामान्य नागरिक असो… हे सर्वच जण नक्कीच HMV म्हणजे He is Maharashtra’s Voice आहेत. राजकीय नेते गप्प बसले तरी खरे HMV मात्र महाराष्ट्राची भूमिका मांडताना कधीही गप्प बसणार नाहीत”, असं रोहित पवारांनी ट्विट करत म्हटलंय.
रोहित पवार देवेंद्र फडणवीसांच्या विधानाला उत्तर देताना पुढे म्हणतात, “कितीही प्रयत्न केले तरी सामान्यांचा आवाज दाबता येत नाही. आजची राजकीय परिस्थिती बघता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्या प्रत्येकालाच आवाज उठवावा लागणार आहे आणि WMV म्हणजेच We Are Maharashtra’s Voice व्हावं लागणार आहे”, असं आवाहन त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला केलंय.
महाराष्ट्राची बाजू मांडणारा मग तो पत्रकार असो.. युवा असो… किंवा सामान्य नागरिक असो.. हे सर्वचजण नक्कीच #HMV म्हणजे #He_is_Maharashtra's_Voice आहेत. राजकीय नेते गप्प बसले तरी खरे #HMV मात्र महाराष्ट्राची भूमिका मांडताना कधीही गप्प बसणार नाहीत.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 1, 2022