शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार

मुंबई/प्रतिनिधी

Sharad Pawar Admitted in Hospital : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.शरद पवार पुढील तीन दिवस रुग्णालयात उपचार घेणार आहेत.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती ‘महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली आहे. रुग्णालयात दाखल होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र डॉक्टरांनी सल्ला देताच शरद पवार यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published.