शिंदे यांचे नेतृत्व आधीपासून मिळायला हवं होतं, शिंदेच खरे शिवसेनेचे उत्तरदायित्व – अमृता फडणवीस

पुणे/प्रतिनिधी

शिवसेनेत बंड करुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. शिंदे यांचा प्रयोग महाविकास आघाडी सरकारच्या पूर्वी व्हायला हवा होता का असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पुण्यातील एका कार्यक्रमात विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, कुटुंबवाद जर बाजूला ठेवला तर शिंदेच खरे शिवसेनेचे उत्तरदायित्व आहेत, तसेच ते खरी शिवसेना पुढे नेण्याचे काम करत असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले.

पुण्यातील वाघोली येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील अनाथ मुला मुलीसोबत थेट संवदाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केले. मुंबई महापालिकेवर भगवा फडकेल असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, शिवसेनेच्या पहिल्या गटाचे राज्य हे 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर राहीले. एवढे वर्ष राज्य असूनही आपल्या नद्या, समुद्र, रस्ते, वाहतूक आणि विकास झालेला नाही. ज्या प्रमाणे विकास व्हायला हवा होता त्याप्रमाणे झाला नाही. आणि आता बदल होणे गरजेचे आहे. आणि याच बदलामुळे मुंबईच्या लोकांना चांगले आयुष्य मिळणार आहे. मुंबईत बदल गरजेचा आहे.

पहाटेच्या शपथविधीबद्दल मला एवढे माहीत आहे, की तो गनिमी कावा होता.पुढे काही आतल्या गोष्टी असेल तर ते त्यांना माहीत असेल. त्यांची पुस्तके येणार आहेत.ते येतील तेंव्हा वाचू. ज्यांची पुस्तके येणार आहेत त्यात कळेल देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्या जीवनात खूप काही लिहिण्यासारखे आहे, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published.