मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर उद्धव गटातील नेत्यांच्या अडचणी वाढत आहेत. संजय राऊत यांच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांनी शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. एसआरए घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केला आहे. याप्रकरणी जून महिन्यात मुंबईतील दादर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
माञ या एफआयआर मध्ये मुलीचं नाव न्हवत या प्रकरणी चौकशी दरम्यान चार जणांना अटक करण्यात आली आहे.त्यात एक व्यक्ती हा महापौर किशोरी पेडणेकर यांचा शेजारी व जवळचा मित्र आहे. तसेच एक बीएमसी कर्मचारी आहे. ज्याने आपल्या निवेदनात किशोरी पेडणेकर चे नाव घेतलं. याप्रकरणी एकूण नऊ जणांवर तक्रार करण्यात आली होती. ही बाब एसआरए झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी संबंधित आहे.
दादर परिसरात एका इमारतीच्या विकासादरम्यान काही लोकांनी पैसे देऊन फ्लॅट खरेदी केले. मात्र त्यांना फ्लॅट मिळालेच नाहीत. ज्या लोकांनी फ्लॅटसाठी पैसे भरले त्या लोकांचा आरोप आहे की, त्यांनी दिलेले पैसे हे बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी व इमारत बांधकामाची संबंधित असलेल्या लोकांनी वापरले.
याच संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या प्रकरणात काही आरोप केलेत. वरळीतील सहा बेकायदेशीर फ्लॅटचा ताबा घेतल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. याप्रकरणी त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधातील नेत्यांना जैरी सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यांना जरी सांगण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना ते भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये गेले. हा वेगळेपणा मला कधीही जमलेला नाही. असं पेडणेकर म्हणाल्या. किरीट सोमय्या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतात. या प्रकरणाबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. दबाव यंत्राने आवाज बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी कायम ठेवला आहे. असं पेडणेकर म्हणाल्या.
तुमच्याकडे केंद्रात सत्ता आहे. राज्यात सत्ता आहे. सत्ता असली म्हणजे काहीही करायचं का आता सवाल पेडणेकर यांनी केला आहे.