मुंबई/प्रतिनिधी
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद सुरू झाला. त्यातच काही दिवसांपूर्वी शिंदेंनी केलेल्या बंडामुळं हा वाद आणखीच शिगेला पोहोचला आहे. परंतु नुकतंच सामना अग्रलेखात ठाकरेंनी फडणवीसांना केलेल्या आवाहनामुळे ठाकरे-फडणवीस एकत्र येणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
राज्यात सत्ता संघर्षानंतर भाजप आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या फयरी झडताना दिसत आहेत. अशात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मैत्रीचा हात पुढे केल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून फडणवीस यांना कटूता संपवण्यासाठी पुढाकार घेण्याचा आवाहन करण्यात आले.
सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हंटलय ?
शिवसेना राहता कामा नये व शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय त्या विषाला ‘बासुंदी’ चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार? शिवसेनेतले काही लोक लाचार किंवा मिंधे केल्याने सत्ता मिळाली; पण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव श्री. फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले? असो. उद्या काय होईल असे जर तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला !!
सामनातून करण्यात आलेल्या आवाहन हे खरोखर आव्हान केलं की फडणवीस यांच्यावर तिरकस टीका केली यावरून सध्या चर्चा सुरू झाल्यात.