उद्धव ठाकरे यांना कशाची सहानुभूती हवी आहे? संदीप देशपांडे

मुंबई/प्रतिनिधी

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला. मात्र दुसरीकडे मनसेच सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांना कशासाठी सहानुभूती हवी आहे, मुंबई खड्ड्यात टाकली त्याबाबत का? असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे. देशपांडे म्हणाले की, तुमचे आमदार फुटले म्हणून तुम्हाला सहानुभूती; तुम्ही मुख्यमंत्री पद गमावली म्हणून तुम्हाला सहानुभूती; तुमचे चिन्ह गेले म्हणून तुम्हाला सहानुभूती.

मग आम्ही गेली 25 वर्ष रस्त्यात नाही, खड्ड्यात चालतोय. 25 वर्ष मुंबईची तुंबई होते आहे. आम्हाला कधी सहानुभूती मिळणार. तुम्हाला नेमकी कशाची सहानुभूती हवी आहे. कोरोना काळात घरात बसला त्याची, की 50 लाखांचे घड्याळ मिळाले त्याची. महापौरांच्या मुलाला कोरोना काळात कंत्राट दिले त्याची सहानुभूती हवी की, रात्री उशिरापर्यंत पबला परवानगी दिलीत त्याची सहानुभूती पाहिजे. असा चिमटा ही देशपांडे यांनी काढला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published.