काँग्रेसला वाईट काळातच दलितांची आठवण का येते? हेच त्यांचं खर प्रेम आहे का? मायावतींचा थेट सवाल…

मुंबई/प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे वयाच्या 80 व्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष बनले आहेत. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत खर्गे यांनी शशी थरूर यांचा दारुण पराभव केला आहे. मात्र या निवडणुकीनंतर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.

मायावतींनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रश्न उपस्थित करत म्हणाल्या, नतून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा त्यांनी ‘बळीचा बकरा’ असं वर्णन केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सतत अपमान केल्याचा आरोपही मायावतींनी काँग्रेसवर केलाय. मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी तिरूअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांचा पराभव करून काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आहे.

मायावतींनी ट्विटमध्ये लिहिले की, काँग्रेसचा इतिहास साक्षी आहे की त्यांनी दिन दलित परमपूज्य डॉ. भीमराव आंबेडकर आणि त्यांच्या समाजाचा वारंवार अपमान केलाय या पक्षाला त्यांच्या चांगल्या दिवसात दलितांची कधीच आठवण होत नाही. मात्र वाईट काळात काँग्रेसला दलितांची आठवण येते असं त्या म्हणाल्या.

आणखी एका ट्विट मध्ये मायावतींनी काँग्रेस दलितांच्या भावनांचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही केलाय. त्यांनी लिहिलंय काँग्रेस पक्षाला आपल्या चांगल्या दिवसांच्या दीर्घकाळात बहुतांश गैर दलितांची आठवण होते, आणि सध्याच्या वाईट दिवसात दलितांची आठवण येत आहे. हे फसव राजकारण नाही का? हेच काँग्रेसचे दलितावरणचं प्रेम आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published.